९८८१४२६१४७ | [email protected]

आद्य ग्रामदैवत श्री भद्रकाली माता

ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी ।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते ।।


चालू घडामोडी

New

न्यासा मार्फत जुन्या मंदिरांचा जिर्णोध्दार करून नविन मंदिर सुसज्ज बांधून तीन दिवसांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यांत आला

New

जुने भाडेकरी काढून त्याजागी संस्कॄत निवासी कार्यशाळा सुरू करणेबाबत काम चालू आहे

New

रोज दुपारी महिलांचा भजनाचा कार्यक्रम असतो

महत्त्वाचे कार्यक्रम

नवरात्रीचे नऊ दिवस उत्सव करण्यांत येतो| रोज सायंकाळी विद्वान ब्राम्हणांमार्फत मंत्र जागरणाचा कार्यक्रम होतो व तसेच अष्टमीचा होम हवन व देवीपुढे घागरी फुंकणे गावातील महिला करतात|अश्विन पोर्णिमेला नवचंडीयाग करण्यात येतो.


चैत्रशुध्द प्रतिपदेला पुण्याहवाचन करून पंचांग पुजन करून पंचागाचे वाचन केले जाते| त्याच प्रमाणे स्थानिक ब्राम्हणवृंदामार्फत सप्तशती पाठाचे वाचन केले जाते| त्या प्रित्यर्थ ब्राम्हणवृंदाचा योग्य तो सन्मान ब्राम्हणवृंदामार्फत सप्तशती पाठाचे वाचन केले जाते| त्या प्रित्यर्थ ब्राम्हणवृंदाचा योग्य तो सन्मान करून दूध पेढे पंचांग यांचे वाटप केले जाते.


न्यासातर्फे प्राच्यविद्यापिठ मार्फत संस्कॄत शिष्यवॄत्ती व गुणगौरव पुरस्कार वितरण समारंभ साजरा करण्यात येतो| या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना संस्कॄत विषयामध्ये 90 टक्के व पुढील मार्क असणाया विद्यार्थ्यांना व तसेच विश्वविद्यालयीन विद्यार्थ्यांना संस्कॄत मध्ये 95 टक्क्यांपुढे मार्क असल्यास विद्यार्थ्यांना शिष्यवॄत्ती देण्यात येते| याच प्रसंगी संस्कॄत भाषेचे विशेष अध्यापन केलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यांत येतो| शिष्यवॄत्तीसाठी न्यासातर्फे खर्च करण्यांत येतो

DONATE…

मंदिराचा पत्ता


श्री भद्रकाली देवी मंदिर (शनि मंदिर ) सा. न्यास

र. नं. अे. ८, भद्रकाली रोड, नाशिक - ४२२ ००१, महाराष्ट्र, भारत

४२२ ००१

ॐ भद्रं करोति इति भद्रकाली ॐ